You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजप गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजप गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड

भाजपच्या सर्व २७ जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया; जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे अभिनंदन

सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी संजय नामदेव बोबडी यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीवेळी जिल्हा परिषदेत निवडून आलेले भाजपचे सर्व २७ सदस्य उपस्थित होते.

या निवड प्रक्रियेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. निवडीनंतर दोघांनीही संजय बोबडी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या २७ सदस्यांनी अधिकृतपणे हा गट स्थापन केला आहे. या गटामध्ये प्रमोद पुंडलिक रावराणे, श्रीमती श्रावणी रोहन रावराणे, श्रीमती रिद्धी रितेश सुतार, श्रीमती प्राची देवानंद इस्वलकर, संतोष चंद्रकांत पारकर, मनोज तुळशीदास रावराणे, श्रीमती सुप्रिया संदीप मेस्त्री, श्रीमती शितल अमित दळवी, संदेश श्रीधर सावंत, संजय नामदेव बोबडी, श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी, श्रीमती अवनी अमोल तेली, श्रीमती अनुराधा महेश नारकर, देवदत्त दामोदर कदम, श्रीमती सावी गंगाराम लोके, सुनील बाळकृष्ण पारकर, श्रीमती क्षमा संदीप हडकर, श्रीमती सुप्रिया संतोष वालावलकर, श्रीमती आरती हरिश्चंद्र पाटील, प्रितेश शंकर राऊळ, श्रीमती शोभा गुलाबराव गावडे, संदीप एकनाथ गावडे, विक्रांत विकास सावंत, श्रीमती अर्पणा वसंत सातोस्कर, प्रमोद मधुकर कामत, श्रीमती श्वेता सूर्यकांत धर्ने आणि रामा दशरथ गवस यांचा समावेश आहे.

गट स्थापन झाल्यानंतर गटनेते संजय बोबडी यांनी जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन गटनेतेपदाबाबतचे पत्र सादर केले.

दरम्यान, १६ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड होणार असून त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप गटाचे नेतृत्व गटनेते म्हणून संजय बोबडी करणार आहेत. त्यांच्या निवडीमुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा