You are currently viewing होळी धुली वंदनाच्या सर्वांना शुभेच्छा!

होळी धुली वंदनाच्या सर्वांना शुभेच्छा!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”होळी धुली वंदनाच्या सर्वांना शुभेच्छा!”*

 

संत सांगती होळी आनंदाचा सण

षड्रिपु भेदाभेदाचे करावे दहन!! धृ!!

 

दैन्य दुःख दूर होते नामस्मरणानं

संत शरण जाता शांत होई मन !!1!!

 

अंतर बाह्य दाटे प्रकाश परमानंद

निर्मळ त्यागी रहावे अंतरंगातून!!2!!

 

प्रपंच नसे बाधक आस अडचण

भोग भोगून जातील बदले प्रारब्ध!!3!!

 

संकुचीतपणा अहं जाळावा अग्नीत

उरेल सफेद रंग पूर्ण ज्वलनांनं!!4!!

 

होळीने होई निरोगी वातावरण

भूमिपुत्र आनंदी राखी पर्यावरण!!5!!

 

©️कवी.श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा