You are currently viewing बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग अंतर्गत कायदेविषयक जनजागृती व महिला सबलीकरण

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग अंतर्गत कायदेविषयक जनजागृती व महिला सबलीकरण

*ज्या देशात महिलांचा सन्मान होतो त्या देशाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही: न्यायमूर्ती पवन ढोरे*

कुडाळ :

स्त्री ही संस्कृत समाजाचा आधारवड आहे तिचा सन्मान करा तिला योग्य न्याय द्या ज्या देशात महिलांचा सन्मान होतो त्या देशाची प्रगती कोणीही रोखू होऊ शकत नाही.” असे उद्गार कुडाळ येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री पवन ढोरे यांनी काढले. ते बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग अंतर्गत कायदेविषयक जनजागृती व महिला सबलीकरण या विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतांमध्ये ” स्त्रीच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीला न्यायालयामध्ये जाण्याची वेळच न येऊन देणे हे सुसंस्कृत समाजाचं एक महत्त्वाचे लक्षण आहे.

स्त्रीचा सन्मान केला पाहिजे आणि तिला विनाविलंब न्याय मिळाला पाहिजे. यातच तिच्या अस्मितेचा गौरव आहे. संस्कृतिची शान आहे. हा विचार समाजातील घराघरात पोचला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समाज घडेल. देश घडेल. नवीन पिढी घडेल.” असे सांगत स्त्रीच्या सन्मानासाठी आणि संरक्षणासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे. त्याचा योग्य तो लाभ स्त्रियांना मिळण्यासाठी कायद्याचे रक्षक, न्याय दान करणाऱ्या व्यक्तीनी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहिला पाहिजे.तसेच पीडित स्त्रीला सन्मानाची वागणूक देण्याची मानसिकता समाजाने निर्माण केली पाहिजे .असे सांगत महिला सबरीकरणासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र येऊया. तिचा सन्मान वाढू या असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर महिला व रात्र महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य अरुण मर्गज नर्सिंग महाविद्यालयाच्या उपराचार्य कल्पना भंडारी ,सीबीएसई च्या प्राचार्य शुभांगी लोकरे, दिवाणी न्यायालयाच्या कार्यालयीन व्यवस्थापक आर्या अडुळकर ,अॅड.उल्का पावसकर,अॅड. तृप्ती वालावलकर -प्रभू देसाई, कविता खोचरे -बोभाटे इ. उपस्थित होत्या. न्यायमूर्ती श्री. पवन ढोरे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलन करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अॅड. उल्का पावसकर यांनी सुद्धा स्त्रियांच्या संरक्षणासाठी व त्यांना न्याय न्याय मिळवून देण्यासाठी कायद्यामध्ये जी विविध कलम आहेत ,तरतुदी आहेत त्यांचा उपस्थितांना परिचय करून दिला व स्त्रीला न्याय मागण्याची, न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची जो समाज वेळच येऊ देणार नाही तोच समाज खऱ्या अर्थाने प्रगत आणि प्रगल्भ झाला आहे. असे म्हणता येईल; कारण जिथे अन्याय तिथे कायदा मग अन्याय न होऊ देता स्त्रीचा आपण सर्वांनी सन्मान राखला पाहिजे. स्त्रीला मिळालेली समाजातून शाब्दिक मदत तिला फार मोठे बळ देऊ शकते. याचं भान समाजाने ठेवून अन्यायग्रस्त स्त्रीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे व अन्याय करणाऱ्या विकृतींना समाजातील जबाबदार घटकांनी ,जाणकार नेत्यांनी ठेचून काढली पाहिजेत. असे सांगत भिऊ नकोस तुझ्या पाठीशी कायदा आहे याचं भान ठेवून स्त्री ने समाजात वावरण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले. अॅड. तृप्ती वालावलकर- प्रभू देसाई यांनी सुद्धा आजच्या समाजातील स्त्रियांच्या तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या सामाजिक स्थानाचा परिचय करून देऊन त्यांच्यावर च्यावर ओढवणाऱ्या विविध प्रसंगांची उपस्थितांना माहिती करून देऊन ज्येष्ठ नागरिक व स्त्रियांना मुक्तपणे वावरण्यासाठी कायद्याच्या असलेल्या तरतुदीचे महत्त्व प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण मर्गज यांनी तर कार्यक्रमाची सूत्रसंचालन आर्या अडुळकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =