You are currently viewing ‘बीएएलएलबी’च्या परीक्षेत तनया वाडकरचे नेत्रदीपक यश

‘बीएएलएलबी’च्या परीक्षेत तनया वाडकरचे नेत्रदीपक यश

सावंतवाडी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मॉडर्न लॉ कॉलेज पुणेची विद्यार्थिनी व सावंतवाडीची रहिवासी कु. तनया रामचंद्र वाडकर हिने ‘बीएएलएलबी’च्या परीक्षेमध्ये ७५ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तनया वाडकर ही सावंतवाडी एसटी महामंडळाचे वरिष्ठ लिपिक राम वाडकर यांची कन्या आहे. विशेष म्हणजे तनयाने कॉलेजच्या पाचही वर्षांत प्रथम क्रमांक पटकावून नेत्रदीपक यश पटकावले आहे. कठोर परिश्रम घेऊन मिळविलेल्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्वांकडून तिचे विशेष कौतुक केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा