You are currently viewing वैभववाडी तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल रावराणे यांचे निधन

वैभववाडी तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल रावराणे यांचे निधन

वैभववाडी

तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल सुधाकर रावराणे वय 45 यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. प्रफुल्ल रावराणे हे मूळ नावळे राणेवाडी येथील रहिवासी होते. व्यवसायानिमित्त ते वैभववाडी येथे राहत होते. गेली बरीच वर्ष ते राजकीय व सामाजिक क्षेत्राची संलग्न होते. वैभववाडी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार होता. दहीहंडी उत्सवात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वैभववाडीतील सुवर्णा मंगल कार्यालयाचे मालक सुधाकर रावराणे यांचे ते सुपुत्र होत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष वैभव रावराणे यांचे ते वडील होतं. रावराणे यांच्या पश्चात पत्नी, आई- वडील, मुलगा, मुलगी, विवाहित बहीण, चुलते, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. रावराणे यांच्यावर निमअरुळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली जाण्याने वैभववाडी शहरासह पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा