You are currently viewing कृपासिंधु दुध संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबिर संपन्न

कृपासिंधु दुध संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबिर संपन्न

कृपासिंधु दुध संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबिर संपन्न

जनावरांच्या आरोग्य, आहार व लसीकरणाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन; शेतकऱ्यांना ५०% सवलतीत औषधांचे वाटप

सावंतवाडी

कृपासिंधु दुध संस्था यांच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. शरद धाऊसकर (पंचायत समिती सदस्य) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. श्री. आसवले (सहा. आयुक्त पशुसंवर्धन, सावंतवाडी), डॉ. श्री. देसाई (तालुका पशुसंवर्धन अधिकारी, सावंतवाडी), श्री. सागर धाऊसकर, सौ. स्नेहा पार्सेकर (ग्रा.प. सदस्य), सौ. निकिता परब (ग्रा.प. सदस्य, न्हावेली), श्री. अर्जुन मुळीक, दुध सह संस्था मळेवाड-न्हावेली ग्रामसंघ पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण शिबिरात डॉ. श्री. देसाई, डॉ. श्री. आसवले, डॉ. श्री. चव्हाण व डॉ. श्री. बाळगी यांनी जनावरांचे योग्य आहार व्यवस्थापन, आरोग्य निगा, लसीकरण तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात न्हावेली, सोनुर्ली व निरवडे येथील शेतकरी तसेच बचतगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच शिबिरादरम्यान गोकुळ व कृपासिंधु दुध संस्थेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीत गोचीड प्रतिबंधक साबण व जंतनाशक औषधांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कृपासिंधु दुध संस्थेच्या वतीने करण्यात आले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा