You are currently viewing दिल्लीत हाय अलर्ट जारी ; राजधानी दिल्लीत हल्ला होण्याची शक्यता

दिल्लीत हाय अलर्ट जारी ; राजधानी दिल्लीत हल्ला होण्याची शक्यता

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी हल्ला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्लीला हाय सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे. एजन्सींना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी दिल्लीत मोठा दहशतवादी कट रचण्याचा विचार करत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 20 जानेवारीपासून यूएवी, पॅराग्लायडर आणि गरम हवेच्या फुग्यांवर बंदी घातली आहे. ही बंदी 15 फेब्रुवारीपर्यंत कायम असणार आहे. याबाबत दिल्ली पोलिसांना सतर्क केले आहे.

पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हँगग्लायडर, यूएवी, यूएएस, मायक्रोलाईट विमान, रिमोट संचालित विमान, गरम हव्याचे फुगे, क्वाडकॉप्टर, विमान किंवा इतर हवाई मार्गाने हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिस उपायुक्त दीपक यादव म्हणाले, प्रजासत्ताकदिनी संपूर्ण दिल्लीत सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांसह, नॅशल सिक्युरिटी गार्डच्या टीम देखील तैनात करण्यात आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी अँटी ड्रोन मॅनेजमेंट सिस्टिम लावण्यात आली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा