You are currently viewing भुईबावडा येथे डोंगरकडा कोसळला : शेतकरी भयभीत

भुईबावडा येथे डोंगरकडा कोसळला : शेतकरी भयभीत

वैभववाडी
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत भुईबावडा येथील डोंगरकडा कोसळला आहे. गावात झालेल्या भूस्खलनाने नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. या भूस्खलनामुळे शेतकऱ्यांच्या वडीलोपार्जीत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे.

सलग चार दिवस मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले होते. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसात भुईबावडा पहिलीवाडी येथील शेवरीचे कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग कोसळला आहे. या घटनेत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. भूस्खलन झालेल्या ठिकाणी नागरिकांच्या सामायिक जमिनी होत्या. संपूर्ण डोंगर गेल्याने मालकी हक्काच्या जमीनी शोधणे शेतकऱ्यांसमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

वस्तीपासून डोंगर काहीसा दूर असल्यामुळे जीवितहानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. यावेळी घटनास्थळी भुईबावडा गावचे सरपंच बाजीराव मोरे, गावचे पाटील, आकोबा मोरे, अमित फकीर व ग्रामस्थांनी जावून पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 2 =