You are currently viewing माजगाव येथे भीषण अपघात

माजगाव येथे भीषण अपघात

माजगाव येथे भीषण अपघात : दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी

मोपा विमानतळावरून परतताना चारचाकीची धडक; एकाला गोवा-बांबुळी येथे हलविले

सावंतवाडी : प्रतिनिधी
मोपा विमानतळावरील ड्युटी संपवून सावंतवाडी येथील घरी परतत असताना माजगाव, मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी रात्री दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात संतोष नारायण सावंत (रा. कोलगाव, सावंतवाडी) आणि जोसेफ डिसोजा (रा. जुना बाजार, सावंतवाडी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सावंत आणि जोसेफ डिसोजा हे मोपा विमानतळावरून आपली ड्युटी आटोपून मोटरसायकलवरून सावंतवाडीकडे येत होते. दरम्यान, माजगाव येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघांनाही गंभीर दुखापत झाली.
जखमींपैकी संतोष सावंत यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. तर जोसेफ डिसोजा यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस अधिकारी मनोज राऊत व श्री. लोकरे पुढील तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा