You are currently viewing बँक ऑफ बडोदा’च्या राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराच्या नामांकनांची घोषणा

बँक ऑफ बडोदा’च्या राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराच्या नामांकनांची घोषणा

*बँक ऑफ बडोदा’च्या राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराच्या नामांकनांची घोषणा*

*भारतीय भाषांमधील साहित्यकृती तसेच त्यांच्या हिंदी अनुवादाचा होणार गौरव*

*मूळ लेखक आणि अनुवादक असे दोघंही ठरणार पुरस्काराचे मानकरी*

*सुप्रसिद्ध लेखिका आणि बुकर पारितोषिक विजेत्या गीतांजली श्री परीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावर*

*मनोज बोरगावकर यांच्या “नदीष्ट” ह्या मराठी कादंबरीला नामांकन*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

बँक ऑफ बडोदा ही भारताची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असून आज ‘बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान’ पुरस्कार २०२३ च्या पहिल्या नामांकन आवृत्तीकरिता १२ कादंबऱ्यांच्या दीर्घ यादीची घोषणा आज (२४ मे) करण्यात आली. विविध भारतीय भाषांमधील साहित्यकृतींना मान्यता देणे तसेच प्रोत्साहन देण्यासाठी आणि अनुवादांद्वारे हिंदी वाचकांना सर्वोत्तम भारतीय साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी, त्याद्वारे रूची विस्तार आणि कादंबरी वाचकांच्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या अद्वितीय पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.

‘बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान’ पुरस्कार मूळ साहित्यकृतीचे लेखक आणि पुस्तकाचे हिंदी अनुवादक अशा दोघांना प्रदान करण्यात येईल. मूळ साहित्यकृतीचे लेखक आणि पुरस्कार विजेत्या पुस्तकाच्या संबंधित हिंदी अनुवादकाला अनुक्रमे रु. २१ लाख आणि रु. १५ लाख, शिवाय आणखी पाच निवडक पुस्तकांच्या लेखक आणि हिंदी अनुवादकांना प्रत्येकी अनुक्रमे रु.३ लाख आणि रु.२ लाखाच्या रोख पुरस्काराने गौरविण्यात येईल.

नामांकन यादीचे अनावरण करताना, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संजीव चढ्ढा म्हणाले, “भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे संस्कृती, धर्म आणि भाषांचा संगम असून विविधतेत त्याची ताकद आणि वेगळेपणा आहे. भारतीय भाषांमधील साहित्याचा प्रचार आमची बहु- सांस्कृतिकता मजबूत करण्यास मदत करतो, असा आमचा विश्वास आहे. मूळ भारतीय भाषेतील साहित्य आणि या कलाकृतींचे हिंदीत अनुवादाला ओळख मिळावी आणि त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने आम्ही बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराची स्थापना केली. बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार देशाच्या विविध भागांतील प्रतिभावान भारतीय लेखकांना राष्ट्रीय व्यासपीठ देईल. भारतीय भाषा साहित्याला चालना देईल. तसेच साहित्यिक अनुवादांना प्रोत्साहन मिळेल.” पाच सदस्यीय परीक्षण मंडळाच्या अध्यक्षा प्रख्यात लेखिका आणि बुकर पारितोषिक विजेत्या माननीय गीतांजली श्री आहेत. इतर चार सदस्यांत भारतीय कवी अरुण कमल, शिक्षण तज्ज्ञ आणि इतिहासकार पुष्पेश पंत, समकालीन भारतीय कवयित्री आणि कादंबरीकार श्रीमती अनामिका आणि हिंदी कथा लेखक आणि अनुवादक प्रभात रंजन यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षक मंडळाची बैठक होणार असून त्यात पहिल्या सहा कादंबर्‍या निवडल्या जाणार आहेत. त्यानंतर ‘बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान’ पुरस्कार विजेत्याची घोषणा १० जून २०२३ रोजी दिल्ली येथे करण्यात येईल.

बँकेच्या वतीने मार्च-एप्रिल २०२३ या कालावधीत नामांकन आमंत्रित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. होती. विविध भारतीय भाषांमध्ये लिहिलेल्या अनेक प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यातून निवड समितीने १२ पुस्तकांची यादी तयार केली.

मूळ कादंबरीचे नाव – अभिप्रेत काल (मूळ भाषा – ओडिया) (मूळ लेखकाचे नाव – परमिता सत्यपथी) (कादंबरीचे भाषांतरीत नाव – अभिप्रेत काळ) (भाषांतकाराचे नाव – अजयकुमार पटनाईक), अल्ला मियां का कारखाना – उर्दू – मोहसीन खान – अल्ला मियां का कारखाना – सईद अहमद, बाकी सफा ५ ते – पंजाबी – रूप सिंग – बाकी सफा ५ पर – सुभाष नीरव, चीनी कोठी – उर्दू – सिद्दीक आलम – चीनी कोठी – अरजूमंद आला, एक खंजर पानी में – उर्दू – खलीद जावेद – एक खंजर पानी में – रिझवान ऊल हक, फत्संग – नेपाळी – चुडेन कविमो – फत्संग : कहानी मिट्टी की – नम्रता चतुर्वेदी, घर पलानो छल्ले – बंगाली – मनोरंजन व्यापारी – भागा हुआ लड़का – अमरिता बेरा, महानदी – बंगाली – अनिता अग्निहोत्री – महानदी – लिपिका सहा, नदीष्ट – मराठी – मनोज बोरगावकर – नदीष्ट – गोरख थोरात, नीमत खाना – उर्दू – खलिद जावेद – नीमत खाना – झमन तारीक, पोईमुगम – तमीळ – वासंथी – मुखौटा – एस भाग्यम शर्मा, धीरक्क अठ्ठा जनलकळ – तमीळ – वासंधी – बंद खिड़कियों – एस भाग्यम शर्मा

मुंबईत आज (२४ मे) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपरोक्त १२ नामांकन प्राप्त साहित्यकृतींपैकी एक मराठी भाषेतील कादंबरी ‘नदीष्ट’ चे मूळ लेखक मनोज बोरगावकर आणि अनुवादक गोरख थोरात हे मुक्त परिसंवादात सहभागी झाले होते. दोन्ही लेखकांनी भारतीय साहित्यविषयक परिघ आणि भारतातील साहित्यिक बांधवांसाठी राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराचे महत्त्व यावर संवाद साधला. ‘नदीष्ट ही कादंबरी गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन जीवनातून निर्माण झालेल्या वातावरणाचे वर्णन करते. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात या कादंबरीचा समावेश करण्यात आला असून पुण्यात नाट्यरूपातही या कादंबरीचे प्रस्तुतीकरण केले जाते. तीन वर्षांतली नववी आवृत्ती संपत आली असून लवकरच दहावी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. आजपर्यंत १५हजार पेक्षा जास्त प्रती वाचकांपर्यंत पोहचल्या आहेत. या कादंबरीचा कन्नड आणि हिंदी भाषेत अनुवाद करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा