सिंधुदुर्गमध्ये दिव्यांगांसाठी सक्षम प्रशिक्षण, रोजगार व निवारा केंद्र लवकरच सुरू
कुडाळ
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल संचलित “सक्षम दिव्यांग प्रशिक्षण, रोजगार व निवारा केंद्र” लवकरच सुरू होणार असून दिव्यांग बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या केंद्रामार्फत दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी तसेच निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संस्थेच्या वतीने इच्छुक दिव्यांग बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी त्वरित संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधून १५ मार्च २०२६ पर्यंत आपली नोंदणी करावी.
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
यू.डी.आय.डी. (स्वावलंबन) कार्ड
अपंग प्रमाणपत्र
रेशनकार्ड
पासपोर्ट साइज फोटो
अधिक माहितीसाठी संस्था अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक:
कसाल ऑफिस: ९६२३६५५१४२
DDRC: ९३२२०७३९९२
दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असून इच्छुकांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
