You are currently viewing बोर्डवे रेल्वे स्टेशन मंजुरी करिता केलेले उपोषण मागे

बोर्डवे रेल्वे स्टेशन मंजुरी करिता केलेले उपोषण मागे

बोर्डवे रेल्वे स्टेशन मंजुरी करिता केलेले उपोषण मागे; सहा महिन्यांत कार्यवाहीचे लेखी आश्वासन

कणकवली

बोर्डवे रेल्वे स्टेशन मंजुरी करिता सुरू असलेले तीन दिवसांचे जोरदार उपोषण अखेर मागे घेण्यात आले. काल सायंकाळी पाच वाजता कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी श्री. आंबार्डेकर यांनी लेखी पत्राद्वारे ठोस आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

दशक्रोशी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या या उपोषणास ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा लाभला होता. संबंधित मागणीबाबत सहा महिन्यांच्या आत प्रस्तावित रेल्वे स्थानकासाठी रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ पत्रव्यवहार करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर संघर्ष समितीने ते लेखी स्वरूपात स्वीकारले.

यानंतर ग्रामस्थांच्या साक्षीने आणि संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी लिंबूपाणी घेऊन उपोषण मागे घेतले. तीन दिवसांच्या या आंदोलनादरम्यान स्थानकाच्या मागणीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देणाऱ्या सर्व नागरिकांचे संघर्ष समितीच्या वतीने जाहीर अभिनंदन व मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

स्थानकाच्या मागणीबाबत दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी वेळेत व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा