बर्ड फ्लू ला घाबरू नका, दक्षता घ्या

बर्ड फ्लू ला घाबरू नका, दक्षता घ्या

सिंधुदुर्गनगरी 

देशातील अनेक राज्यांतील पक्षांमध्ये बर्ड फ्लू आजाराची लागण झाल्याचे दिसत आहे. त्यामध्ये केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमध्ये बदके, कोंबड्या, कावळे स्थलांतरिक पक्षी यामध्ये प्रामुख्याने या आझाराची लागण झालेली दिसून येत आहे. सध्या हा आजार फक्त पक्षांमध्ये आहे. परंतू वन हेल्थ संकल्पनेनुसार आरोग्य विभागातर्फे कार्यवाही करण्यात येत आहे.

            या आजाराबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर याविषयी खबरदारी घ्यावी. नागरिकांनी पुढील प्रमाणे खबरदारी घ्यावी. पक्षी स्त्रावासोबत संपर्क टाळा, पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जन्ट पावडर ने धुवा, शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा, एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षांना उघ़ड्या हाताने संपर्श करू नका, जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षास ताबडतोब कळवा. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना हात पाणी व साबणाने वारंवार धुवा, व्यक्तीगत स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा. कच्चे चिकन, चिकन उत्पादननासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करा, पूर्ण शिजविलेल्या 10 डिग्री सेल्सीअस मांसाचाच खाण्यात वापर करा, आपल्या गल्लीत अथवा परिसरात तलाव असेल आणि त्या तलावात पक्षी येत असतील तर या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वन विभाग, पशुसंवर्धन विभागास कळवा. नागरिकांनी पुढील गोष्टी टाळाव्यात कच्चे चिकन, कच्ची अंडी खाऊ नका, अर्धवट शिजलेले चिकन, पक्षी, अर्धवट उकडलेले अंडी खाऊ नका, आजारी दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका, पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेऊ नका.

            आरोग्य विभागातर्फे योग्य त्या सर्व उपाययोजना वन हेल्थ संकल्पनेनुसार करण्यात येत आहेत. तसेच वन व पशुसंवर्धन विभागामार्फतही या उपाययोजना राबविण्यातय येत आहेत. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा