You are currently viewing सावंतवाडीत २ मे ला नारायण राणेंच्या प्रचारार्थ महायुतीची रॅली

सावंतवाडीत २ मे ला नारायण राणेंच्या प्रचारार्थ महायुतीची रॅली

*संजू परब यांची माहिती*

 

सावंतवाडी :

सावंतवाडी शहरात २ मे ला महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीचा शुभारंभ महायुतीच्या प्रचार कार्यालयातून मंत्री दीपक केसरकर व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, चराठा सरपंच अमित परब उपस्थित होते. दरम्यान या रॅली मध्ये एक हजारहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर माजी खासदार निलेश राणे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती संजू परब यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा