You are currently viewing शहरातील विकास कामांचे उद्घाटन म्हणजे भाजपचे आयत्या बिळावर नागोबा

शहरातील विकास कामांचे उद्घाटन म्हणजे भाजपचे आयत्या बिळावर नागोबा

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची पत्रकार परिषदेत टीका

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील जे काही आज विकास कामाची लोकार्पण व भुमिपूजन सोहळा होत आहेत ती आमदार दिपक केसरकर यांच्या काळात मंजूर झालेली असून, भाजपने केलेली आजचे लोकार्पण आणि भूमिपूजन हे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टिका जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिपक केसरकर यांच्या कार्यलायत पत्रकार परिषदेत केली आहे. ते पुढे म्हणाले की नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी नगरपालिकेत किती निधी दिला हे जाहीर करावे असे आवाहन दिले आहे. केसरकर यांच्या ताब्यात नगरपालिका असताना कधीही स्टॉल धारक आणि नगरपालिकेचा वाद झाला नाही होता असे देखील ते म्हणाले आहेत. यावेळी तालुक्यातील ११ ही ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे ११९ ही सदस्य निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच शहरातील विकास कामांची उद्घाटन शासकीय पद्धतीने होणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केली आहे. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, अशोक दळवी,

प्रतिक्रिया व्यक्त करा