You are currently viewing फाल्गुनातला शिमगा

फाल्गुनातला शिमगा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*फाल्गुनातला शिमगा*

 

वसंत पंचमी झाल्यावर थंडीचे ठाणे ऊठतेच. हळू हळू आपला बाडबिस्तरा ती आवरायला लागते. हवेत ऊष्मा जाणवू लागतो.

आता येतो शेवटचा सण. फाल्गुन पोर्णिमेचा. तिला होळी, शिमगा, होलिकादहन अशी वेगवेगळी नावे आहेत. महाराष्ट्र, ऊ. प्रदेश, मध्यप्रदेश, गुजराथ इ. ऊत्तरेकडे जरा अधिक भाविकतेने ही साजरी केली जाते.मुळात आपले सण हे पीक, कापणीहंगाम, ऋतूचक्र हवामान यावर लक्ष ठेऊन योजलेले आहेत म्हणुनच आपल्या सणाच्या रूढी, परंपरा या मांगल्याच्या आहेत.

आता हिवाळा सरून ऊन्हाळा येतो, शिशिर संपून वसंत येतो, हवा व हवामान बदलतेच. निसर्गात बदल होऊन चैतन्याने भारलेले नवरंग ऊधळू लागतात. हवेतला शुष्कपणा, पानगळ, ओकीबोकी निष्पर्ण तरूवेली, ऊदासी, अंधार सारे बदलते व नवचैतन्याचे वातावरण आसमंतात बहरते‌.

शेत वावरात ऊस, कापूस , ज्वारी, हळद, तंबाखू, हरभरा, अशी पीके व भरपूर भाजीपाला फळं फूलं येऊ लागतात.

आंब्यावर फणसावर इवलूशी बाळफळं खेळू लागतात. मोहोराचा सुगंध सुटतो.

गाई गुरांना पशूपक्षांना ऊब मिळते. बोचणारा गारठा संपतो. आकाश छान प्रकाश सांडू लागते.

मन आनंदी हैणारच ना,?

देवाचे आभार मानण्यासाठी शेतात बळीराजा पूजा करतो. गुर्हाळे लागतात. कापणी सुरू होते. आणि या आनंदातच होळी येते.

होळीआधी आठदिवस स्त्रीया नाचत गात सजून नटून होलिकामातेची गाणी गातात त्यांना होलाष्टक म्हणतात.

मथुरा वृंदावन ऊ. प्रदेश इथे आजही श्रीकृष्ण होळी खेळतो असे मानून भाविकतेने सण पार पडतो.

पोर्णिमेला श्रद्धाळू दिवसभर ऊपवास पूजा पाठ करतात. संध्याकाळी खड्डा खणून त्यात एक मोठे झाड पूरतात. त्याची पूजा करतात नंतर बाकीची लाकडे, फांद्या, पेंढा, शेण्या, करवंट्या सुकी पाने, कागद, छोटी मोठी नको ती लाकडे इ. रचतात. तिला फूलांचा हार, बत्तासे साखर्यांचाही हार घालतात.द्राक्षांची माळ बांधतात,

नारळ दक्षिणा, नैवेद्य ठेवतात. हा बहुदा पूरणपोळीचाच असतो. पूजा करून ऊपास सोडतात. घरी भाजलेला नारळ नेतात. प्रसाद वाटतात.

रात्री फेर धरत नाचतात. त्यावर पाणी गरम करून मुलांच्या अंघोळीत मिसळतात. वर्षभराची भांडणे, तंटेबखेडे, वैर, जून्या संवयी जूने कपडे इ. होळीत जाळतात बोंबामारत वैर संपवतात. शिव्या रंग, पाण्याचे फूगे मारतात, आता हे संपले कि, परत चैत्रासाठी नविन अंतकरणाने एकत्र व्हायचे. जून्याचा त्याग करत नवे स्विकारायचे. नवा गूळ,हरभरा, गहू वापरून पूरणपोळी बनवायची.

पांचव्या दिवशी केशराने रंग खेळत रंगपंचमी साजरी होते. दुसरा दिवस धूळवड साजरी होते.अत्यंत ऊदात्त हेतूने हा सण योजला आहे. निसर्ग सूद्धा जूनी पाने, फळे फूले फांद्या यांचा त्याग करून नविन चैत्रपालवी स्विकारायला तयार होतो. तसेच आपणही.

या अशा सणवारांमुळे समाज एकवटतो. विचारांची देवघेव होते. सोबत मिळते. आनंद वाढतो. मुलांंवर संस्कार होतात. धर्मरक्षण होते. परिसर स्वच्छ होतो.

पण यात पुर्वापार भांग पिण्याची पद्धत रूढ आहे. पूढे ते दारूवर गेले.

अशा गोष्टी टाळून स्त्रीयांचा सन्मान राखला जाईल अशाच तर्हेने ते साजरे व्हावेत.

 

अनुराधा जोशी.9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा