You are currently viewing नक्षत्रं.. चांदणे
Oplus_16908288

नक्षत्रं.. चांदणे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नक्षत्रं.. चांदणे*

 

माय मराठी मराठी जणू नक्षत्रं चांदणे

गर्भश्रीमंत मराठी काय आहे तिला उणे

 

नावाजली शाहिरांनी संतपंतांची लाडकी

डफावर पडे थाप कडाडते ती ढोलकी..

 

दरबारात रुजली अटकेपार ती फडके

किती कवी नि शाहिर मराठीचे ते लाडके

 

कवी वामन पंडित वि वा शिरवाडकर

किती झाले मराठीत नामांकित नाटककार..

 

वि दा विद्वान हो किती गीत स्वतंत्रतेचे ते

लोकमान्य टिळक नि आगरकर ही होते

 

शि म परांजपे महान लोकहितवादी मोठे

माय मराठीला पूजा नाही भेटणार कोठे

 

तिच्या लावा हो पताका ठायी ठायी जागोजाग

राष्ट्र महान होण्यास किती लोकांनी केला त्याग

 

करा करा हो प्रेम भक्ती वाढवा तिज रोज

बोला मराठी नि लिहा जागरही जागोजाग ..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा