You are currently viewing पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्व 2026 संपन्न

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्व 2026 संपन्न

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्व 2026 संपन्न

पिंपरी

आजच्या युवकांचे मन, मेंदु आणि मनगट मजबूत करण्यासाठी शिवरायांचे जीवन चरित्र ही खरी प्रेरणा असल्याचे मत शिव व्याख्याते भरत पांगारे यांनी व्यक्त केले. डांगे चौक, चिंचवड येथे १८ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्व 2026 अंतर्गत छत्रपती शिवराय म्हणजे मूर्तिमंत जीवन विद्या या विषयावर व्याख्यान देताना शिव विख्याते भरत पांगारे बोलत होते.
यावेळी विद्युत पर्यवेक्षक प्रमोद खाडे, निवेदक किशोर केदारी, करण तुपे, संकेत जोशी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश परब, जयवंत साळुंखे, संदीप साळुंखे, मधुकर लोहार, जितेंद्र साळुंखे, अमित मिसाळ, बिंदू माधव देशपांडे, वसंत शिंदे, जयरामन अण्णा, यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी अलौकिक युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि सद्गुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेली जीवनविद्या यांची सुरेख सांगड घालून विविध पोवाडे, उदाहरणे,दाखले, देऊन पांगारे यांनी शिवरायांच्या इतिहासाची उजळणी केली.
जीवन विद्या मिशनचे आदर्श म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज कसे पूजनीय आहेत हे विविध पैलूनी त्यांनी उलगडून सांगितले. जगभरात हजारो, लाखों राजे होऊन गेले परंतु दुर्गुण नसलेला एकमेव राजा म्हणजे शिवाजी महाराज होय. जीवन विद्या मिशन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या माध्यमातून त्यांनी, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, महिला सन्मान, जातीयता, विषमता, धर्मांधता अशा अनेक सामाजिक समस्यांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरवात जीवन विद्या प्रणित ज्ञानेश्वर माऊलीच्या हरी पाठ आणि प्रबोधनात्मक नाम संकीर्तनानी झाली.
प्रख्यात शिवव्याख्याते भरत पांगरे यांनी आपल्या ओघवत्या, सुस्पष्ट, व मधुर वाणीतून दोन अडीच तास आपल्या उदबोधक व्याख्यानातून प्रेक्षकांना अक्षरशः खीळवून ठेवले. यावेळी शंकर गणगे महाराज, ऋषिकेश कांबळे, शरद बोरगे, लक्ष्मण शिंदे, सरोज ठाकरे, माणशी परब, सुचिता वाडेकर सह आदि कलाकारांनी भरत पांगरे यांना साथ संगत करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा