You are currently viewing कणकवली गडनदी पात्रात सापडला मृतदेह

कणकवली गडनदी पात्रात सापडला मृतदेह

कणकवली

कणकवली शहरालगत मराठा मंडळ नजीक असलेल्या केटी बंधाऱ्याच्या वरील भागात एका व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात सकाळी आढळून आला.ही व्यक्ती सध्या रा. कणकवली बिजलीनगर, मूळ – ओसरगाव येथील रविदास तुकाराम चौकेकर (वय ५०) असल्याचे समजले

याबाबत माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, चंद्रकांत माने, मंगेश बावधने, किरण मेथे, सचिन माने , वागदे पोलीस पाटील सुनिल कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मात्र सदर व्यक्ती ही साधारणतः ५० वर्षाची असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसत होते. वर्णनानुसार राखाडी कलरची ट्रॅक पॅन्ट व मरून कलरचा फुल हाताचा शर्ट असा त्या व्यक्तीचा पेहराव होता. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढला व सदर व्यक्ती कोण त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले.

अगदी काही मिनिटातच त्या मृतदेहाबाबत माहिती मिळाली, सध्या रा. कणकवली बिजलीनगर, मूळ – ओसरगाव येथील रविदास तुकाराम चौकेकर (वय ५०) यांचा असल्याचे समजले. रविदास चौकेकर हे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सफाईगार या पदावर कार्यरत होते. सफाईगार असले तरी मृतदेहाचे पोस्टमार्टम करताना त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असायची. २०१६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. दरम्यान, त्यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू नेमका कसा झाला ? याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.रविदास चौकेकर यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी असल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा