You are currently viewing तरुणाने पोलिस व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या अंगावर ओतले पेट्रोल

तरुणाने पोलिस व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या अंगावर ओतले पेट्रोल

कणकवली पटवर्धन चौकातील घटना : विनामास्क कारवाई केल्याने केले कृत्य

कणकवली

आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे आपली ड्युटी करणारे वाहतूक पोलीस विश्वजीत परब व चंद्रकांत माने यांच्या अंगावर एका तरुणाने बाटलीतून चक्क पेट्रोल ओतले. तरुणाने तेवढ्यावरच न थांबता सोबतच आणलेल्या माचीसच्या आग काडीने पेटविण्याचाही प्रयत्न केला. दोन्ही ट्राफिक पोलीस आपल्या ड्युटीमध्ये मग्न असताना अचानक तरुणाने तेथे जात हे कृत्य केले. या प्रकरणी दशरथ दिगंबर दाभोळकर( वय १८ राहणार वडाचापाट, मालवण) याला ताब्यात घेण्यात आले आहे. सरकारी कामात अडथळा आणि शासकीय कर्मचाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

सुदैवाने याच ठीकाणी विनामास्क फिरणार्‍यांबाबत कारवाईसाठी तैनात असलेले न.प.चे कर्मचारी रविंद्र म्हाडेश्वर व प्रविण गायकवाड यांनी तरुणास रोखत. त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.तदपूर्वी उपस्थितांनी त्याला चोप देखील दिला.घडल्या प्रकाराची तरुणाकडून पोलिस्थानाकात कसून चौकशी सुरु असून नक्की कोणत्या कारणावरून हे कृत्य केले असावे याची उलट सुलट चर्चा चौकासह शहरात सुरू आहे.ही घटना आज सायंकाळी ५.१५ वा घडली असून या घटनेनंतर संशयिताला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा