*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*हुंडा .. एक सामाजिक समस्या*
आज मुली आहेत शिकलेल्या. कमावत्या. घरसंसार, नोकरी, मुलांचं संगोपन, घरातील जेष्ठ व्यक्ती, नातेसंबंध, घरपण, अशा अनेक समस्यांना समर्थपणे तोंड देत पूढचे शिखर गाठत आहेत.
अभिमान वाटेल अशीच त्यांची प्रगती आहे. कोणतंही क्षेत्र घ्या अगदी ट्रक चालवून संसार साभाळणे ते ड्रायव्हर कंडक्टर, अंतराळवीर, संशोधन पायलट, सैन्य किंवा पोलीस अधिकारी, शेती, व्यवसाय कूठेच त्या कमी नाहीत ऊलट त्या अग्रेसर आहेत.
असं असुनही समाजाची मानसिकता बदलत नाही.
आज दरमहा पगार आणणार्या स्त्रीसाठी सुद्धा या ना त्या स्वरूपात हुंडा मागितला जातो. हूंडा का आणि कशासाठी?
मुलगी काय आईबाबांना जड होते,? नकोशी होते?
तुमच्याच मुलाच्या सुखासाठी, वंशवृद्धीसाठी घराची शोभा म्हणुन तिला लग्नकार्यात लक्ष्मीच्या रूपात घरी गृहप्रवेश करून आणता.
मग हुंडा का हवा,?
पूर्वी स्त्री कमावती, शिकलेली नव्हती. तिचा घरावल बोजा पडणार हे गृहित धरून मुलीला पोसू म्हणुन हुंडा मागत.
पण आता परिस्थिती बदलली आहे.
सरकारनेही हुंडाबंदीचा कायदा करून , मुलींना शिक्षण माफ करून खुपच अगतिकता बदललेली आहे.
परंतु समाजमन काही सुधारत नाही.
हुंडा, मानपान, लग्न खर्च… तो ही अवाजवी हवा.. सगळं वधूकडुन करवून घ्यायचं
वराकडच्यांनी फक्त घ्यायचं.
पण आता हे सर्वच थरात बदलायला हवं. प्रत्येक जाती धर्मात बदलायला पाहिजे. मुली जर कूठेही कमी पडत नाहीत तर हुंडा का हवा?
खरं तर आयुष्यात एकदाच होणार्या या विवाह सोहळ्याला जवळचे आप्त, मित्रमैत्रिणी, गणगोत ह्या फक्त आपुलकीने येऊन जिव्हाळ्याने सहभागी होणार्यांनिच फक्त बोलवावे. या मंगलसमयी आशीर्वाद द्यावेत. काही गरजेच्या वस्तूंची दोन्हीकडून देव घेव व्हावी. नासाडी होणार नाही अशी जेवणावळ असावी.
शेवटी माहेरचे अंगण आपल्यासाठी येणार्या नववधूचे स्वागत असावे.
तिच्या मनस्थीतीची कल्पना असावी कारण ती एकटीच एका परक्या गावात, घरात, माणसात येऊन पडते. तिला आपुलकीची खरी गरज काही दिवस असते अशावेळी तिला हुंडा कमी दिला…. दिलाच नाही… मानपान केले नाही.. एक ना दोन अनेक कारणांवरून अवहेलना केली जाते. माहेरून पैसे हुंडा म्हणुनआणायला सांगणे , महागडी वस्तू मागणे हे सारे नको ते घडत रहाते.
ती मुलगी व्यथीत होते. वडिलांनी आधीच खूप खर्च केलेला असतो आता आणिक मागायला तिला संकोच होतो. यातुन भांडणे, वाद, ऊपासमार, मारझोड, अगदी भाजणे जाळणे इतपर्यंत लोक अमानुषपणा करतात. एका चांगल्या घरातील मुलीला मारून टाकतात.
हा छळ फक्त मुलीनाच सोसावा लागतो
केवळ लोभ म्हणुन किंवा प्रतिष्ठेसाठी सुद्धा हुंडा मागतात.
मिळालेल्या हुंड्यावर नवरा व घरचे मोठेपणा मिरवतात.
स्त्रीया पुढचे खुप शिकतात मग त्यासाठी खर्च होतोच. तरीसुद्धा निर्लज्जपणे मागतात. हट्ट धरतात.
ही आजही अपवाद सोडला तर ग्रामीण भागातील मोठी समस्या आहे.
सुशिक्षित अशिक्षित किंवा गाव शहर असा भेदही ऊरलेला नाही. हुंडा मागणे ही विकृतीच आहे.
समाजापुढची मोठी समस्या आहे.
सरकारी कायदेही कोणी मानत नाही.
स्त्रीला आधी माणूस म्हणुन वागवायला शिकायला हवे आहे. कोणत्याही वयातील स्त्रीला सन्मानानी वागवायला हवं. तिच्या कर्तृत्वाचे कौतुक हवे.
एक घरातील मानाचा सभासद तिला समजलंच पाहिजे.
तिचं मन , मत समजुन घेतलं पाहिजे.
माणुसकीने वागवायला पाहिजे.
तीची सुरक्षितता अग्रक्रमाने बघितली पाहिजे.
स्त्रीनेच स्त्रीचा आदर राखला पाहिजे.
हुंडा ही लाच आहे भ्रष्टाचार आहे असं मन तयार करायला हवं आहे.
जेव्हा समाज ह्या भूमिकेतून स्त्री बघेल तेव्हाच ही समस्या थोडी कमी जाचक होईल.
एक घरची जबाबदार स्वामिनी बनवा. हुंड्याला विसरून जा.
तरच घरोघरी माणुसकी नांदेल.
अनुराधा जोशी
9820023605
