You are currently viewing ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांसाठी धार्मिक स्थळे खुली; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश

ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांसाठी धार्मिक स्थळे खुली; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक आणि गर्भवती महिला ज्यांनी कोविड-19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहेत, अशांना धार्मिकस्थळे आणि प्रार्थनास्थळे मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून खुली करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले आहेत.

या आदेशात म्हटले आहे, जिल्ह्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक आणि गर्भवती महिला ज्यांनी कोव्हीड 19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहेत, अशांना धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून खुली करणेत येत आहेत. तसेच धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मास्क परिधान करणे, शारिरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

यापूर्वी कोविड-19 व्यवस्थापनासाठी या कार्यालयाकडून विहित केलेले दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजीचे, आदेश आणि त्यात उल्लेख असलेल्या बाबी या सर्व निर्बंधासह पुढील आदेश होईपर्यंत तशाच लागू राहतील.

उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदरचा आदेश संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयाच्या क्षेत्रासाठी लागू राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा