*आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये -वैभव नाईक*
*आडेली येथे नवनिर्वाचित जि.प. सदस्य विजय नाईक यांचा मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते झाला भव्य सत्कार*
वेंगुर्ले मध्ये भाजप आणि शिंदे गट सर्व शक्तीनिशी लढत असताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय नाईक हे आडेली जिल्हा परिषद सदस्य पदी निवडून आले. यामाध्यमातून आडेली हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे विजय नाईक यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये आहे. येथील जनता निष्ठावंत शिवसैनिकाच्या पाठीशी राहिली आहे. ज्या विश्वासाने जनतेने आपल्याला संधी दिली त्या संधीचे सोने करा.जनतेच्या कल्याणासाठी कायम तत्पर रहा. मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतला भेटी देऊन गावातील जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते अग्रक्रमाने सोडवा. जि. प. सदस्य म्हणून मिळणाऱ्या निधीचा योग्य प्रकारे उपयोग करून पुढील ५ वर्षे प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून काम करावे आणि संपूर्ण तालुक्यात आपली छाप उमटवावी अशा शब्दात माजी आमदार वैभव नाईक यांनी विजय नाईक यांना शुभेच्छा दिल्या.
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित जि. प. सदस्य विजय नाईक यांचा काल मंगळवारी सायंकाळी आडेली आंबेडकरनगर येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, तालुकाप्रमुख निलेश चमणकर शहरप्रमुख शैलेश परुळेकर,नूतन जि. प. सदस्य संजय गावडे, कुडाळ तालुकासंघटक बबन बोभाटे,आडेलीचे मानकरी जयवंत धर्णे, आडेली उपसरपंच परेश हळणकर, आडेली माजी सरपंच भारत धर्णे, माजी उपसरपंच घन:श्याम नाईक, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत, प्रशांत मुंडये,जयप्रकाश चमणकर, महेश परब, युवा कार्यकर्ते स्वप्नील गडेकर, ओंकार नाईक, रमेश आडेलकर, रामदास आडेलकर, सखाराम आडेलकर, राजेश सावंत,अजय गडेकर,आपा ठाकूर,अरुण धर्णे, अशोक गावडे, दीपक गावडे, फक्री आडेलकर, पुरुषोत्तम धर्णे , प्रशांत मुंडये, तुषार कांबळी, सुधीर मुंडये, अरविंद बागायतकर, राजन धुतनकर,अविनाश तोरसकर, योगेश कुबल यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना विजय नाईक यांनी आडेलीवासीय व आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. येथील जलजीवन मिशन योजनेचे प्रश्न, आडेली गावठणवाडी येथील पाण्याचा प्रश्न, आडेली खुटवळवाडी येथील अपूर्ण असलेले काम पूर्ण करून नागरिकांना नळपाणी पुरवठा व मतदारसंघातील इतर समस्या मार्गी लावल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मतदारसंघात अनेक विकासकामे ठप्प आहेत, ती पूर्णत्वास नेणार. तसेच दर महिन्याला प्रत्येक ग्रामपंचायतला भेटी देऊन येथील नागरिकांच्या, गोरगरिबांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे विजय नाईक यांनी सांगितले.
