You are currently viewing रेडी किल्ले यशवंतगड येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव

रेडी किल्ले यशवंतगड येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव

*रेडी किल्ले यशवंतगड येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव*

रेडी

रेडी येथील दुर्गरक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाचे औचित्य साधून मंडळाच्यावतीने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ९:०० वाजता किल्ले यशवंतगड येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे बाईक रॅलीने आगमन होईल. गडाच्या पायथ्याकडून गडावर पालखीवर फुलांची उधळण व जयघोष करीत पूजनस्थळी यशवंतगड येथे पालखी पोहोचेल. त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने विधिपूर्वक मूर्तीपूजन होऊन १०.०० वाजता शिववंदना,ध्येयमंत्र,प्रेरणा मंत्र होऊन सर्व रयतेसाठी शिवपूजनाची सुरुवात होईल. उपस्थित सर्व महिला वर्गासाठी हळदीकुंकू कार्यक्रम असेल. १०.३० वाजता जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा सुरु होईल. दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे.
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन हे ३ गटांमध्ये करण्यात आलेले असून त्यात प्राथमिक गटामध्ये इयत्ता पहिली ते चौथी हा लहान गट असून त्यासाठी माझा आवडता प्राणी/पक्षी, विदुषक (जोकर) विषयावर चित्रीकरण करावयाचे असून प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये ₹.७०१/-,द्वितीय ₹.५०१/-,तृतीय ₹.३०१/- कै. सौ.इंद्रायणी रवींद्र भगत यांच्या स्मरणार्थ सौ. अनसा वासुदेव भगत पुरस्कृत.
दुसऱ्या गटामध्ये इयत्ता पाचवी ते सातवीसाठी ग्रामीण जीवन (शेतकरी), भारतीय संस्कृती/सण (होळी, दिवाळी, इत्या.) विषयांवर चित्रीकरण करावयाचे असून प्रथम पारितोषिक रोख रक्कम ₹ १००१/-,द्वितीय ₹.७०१/- व तृतीय ₹५०१/- लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी कडून पुरस्कृत.
तिसऱ्या गटामध्ये इयत्ता आठवी ते पंधरावी साठी महाराष्ट्रातील गडकिल्ले, हिंदू ऐतिहासिक स्थळे, वास्तू या विषयांवर चित्रीकरण करावयाचे असून प्रथम पारितोषिक रोख रक्कम ₹.१,५०१/-,द्वितीय ₹.१,००१/-,तृतीय ₹.७०१/- ही सर्व पारितोषिक रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,रेडी यांच्याकडून पुरस्कृत केलेली आहेत.सर्व गटातील विजेत्या स्पर्धकांना श्री. चंद्रकांत सुरबा केदार यांच्याकडून आकर्षक चषक पुरस्कृत करण्यात आले आहे.सर्व स्पर्धकांनी दिलेल्या वेळेत यशवंतगडावर उपस्थित राहावे.तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र दिले जाईल.
तरी समस्त शिवप्रेमींनी ह्या उत्सवात उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्गरक्षक प्रतिष्ठान,रेडी(शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा