You are currently viewing बांदा ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट

बांदा ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट

बांदा

बांदा ग्रामपंचायत सदस्यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री दीपकभाई केसरकर यांची भेट घेऊन बांदा येथील जिल्हा परिषद शाळांमधील समस्यांसंदर्भात मागणी व निवेदनपत्र देण्यात आले. यावेळी संपूर्ण जिल्ह्यात बांदा केंद्र शाळा क्रमांक एक ची विद्यार्थी संख्या ही सर्वात जास्त असून देखील त्या प्रमाणात शिक्षक संख्या कमी आहे हे शिक्षणमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले व तातडीने चार शिक्षकांची उपलब्धता करण्याकरिता निवेदनही देण्यात आले. त्याचवेळी केंद्र शाळा क्रमांक एक येथील विद्यार्थ्यांकरिता माध्यान्न भोजन बनवण्याची खोली ही वापरण्याकरता अयोग्य व धोकादायक बनली आहे, त्यामुळे तिचे त्वरित नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे याबाबतही माननीय शिक्षण मंत्री यांना विनंती करण्यात आली. त्याचप्रमाणे निमजगा येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही सध्या धोकादायक अवस्थेत असून त्या परिस्थितीत तिथे शाळा भरवणे धोकादायक आहे. त्यामुळे सदर शाळेची वापरात असलेली इमारत अति-तातडीने निर्लेखित करून अद्ययावत अशी नवीन शाळा बांधणे गरजेचे आहे, याबाबतही मागणी करण्यात आली. यावेळी मा. शिक्षणमंत्री श्री दीपकभाई केसरकर यांचेकडून त्वरीत आदेशाने दोन शिक्षक दिल्याचे तसेच वरील सर्व विषयात आपण स्वतः लक्ष देणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच बांदा केंद्र शाळा क्रमांक एक ही शाळा आंतरराष्ट्रीय स्तराची बनवण्याची योजना असल्याचे देखील सांगण्यात आले व सदर शाळेकरिता स्कूल बस उपलब्ध करून देणार असल्याचे देखील सांगितले.
यावेळी बांदा भाजपा शहराध्यक्ष श्री नरसिंह काणेकर ,ग्रामपंचायत वार्ड क्रमांक एक चे सदस्य श्री राजाराम उर्फ आबा धारगळकर वार्ड क्र. तीन चे सदस्य श्री रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, तनुजा वराडकर, गुरु कल्याणकर व सामाजिक कार्यकर्ते हेमंत दाभोळकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =