You are currently viewing दहावीच्या परीक्षार्थीसाठी अर्चना घारेंकडून वाहन व्यवस्था..!

दहावीच्या परीक्षार्थीसाठी अर्चना घारेंकडून वाहन व्यवस्था..!

अर्चना फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांनी केले स्वागत

सावंतवाडी :

आजपासून सुरू झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट असलेल्या सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीनही तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ने -आण करण्यासाठी अर्चना घारे यांनी चांगल्या प्रकारे वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली असून या स्तुत्य उपक्रमास अनेकांनी दाद दिली असून अर्चना घारे यांची या उपक्रमाबद्दल त्यांचे समाजातील मान्यवरांकडून अभिनंदनही करण्यात आले.

आज सावंतवाडी तालुक्यातील आरोस विद्या विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस तसेच आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस येथे स्वतः अर्चना घारे – परब यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली. तसेच केवळ सावंतवाडी तालुकाच नव्हे तर दोडामार्ग व वेंगुर्ला या तीनही तालुक्यातील विविध शाळांमध्ये हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

यात माध्यमिक विद्यालय सोनावल, श्री नवदुर्ग माध्यमिक विद्यालय, आयी, श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे, माध्यमिक विद्यालय मांगेली या दोडामार्ग तालुक्यातील शाळांमध्ये तसेच वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे, काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली, डॉ. रा. धो. खानोलकर हायस्कूल मठ आणि अणसुर पाल हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल तुळस, न्यू इंग्लिश स्कूल मातोंड या शाळांतील विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. तसेच सावंतवाडी तालुक्यातील रवळनाथ विद्या मंदिर ओटवणे, न्यू इंग्लिश स्कूल चौकुळ, माध्यमिक विद्यालय माडखोल, पावणाई विद्यामंदिर शिरशिंगे, कै. बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालय दाणोली, श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असणीये, न्यू इंग्लिश स्कू कलंबिस्त, विद्याविहार इंग्लिश हायस्कूल आरोस, पंचक्रोशी विद्याविहार हायस्कूल, आरोस या शाळांमध्ये अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था करून देण्यात आली आहे.

आरोस विद्या विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस तसेच आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल आरोस येथे या वाहन व्यवस्थेचा शुभारंभ संस्था अध्यक्ष निलेश परब व स्वतः अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अर्चना घारे – परब यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत कामत, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर प्रा. सुषमा मांजरेकर, अनुष्का गावडे , रूपा कामत, शिक्षक अनिल नाईक, तानाजी वरक, गजानन परब, नारायण मोरजकर, शांताराम आरोलकर, श्रीधर नाईक, अर्जुन मुळीक, विश्वंभर नाईक ,अमोल नाईक, महेश आरोसकर, अमित न्हावी, गणपत पराडकर, बाळा कळंगुटकर, संतोष बर्डे, श्री. कुबल, हेमंत कळंगुटकर, शरद कळंगुटकर, पत्रकार मदन मुरकर, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

यावेळी अर्चना घारे म्हणाल्या, आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांची अफाट बुद्धिमत्ता आहे. मात्र अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या पालकांना शिक्षणासाठी आर्थिक भार सोसणे शक्य होत नाही. याचे सामाजिक भान ठेवत अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था तीनही तालुक्यात करून देण्यात आली आहे. असे सांगून त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी पेन बक्षीस देत त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या. मुख्याध्यापक सदाशिव धूपकर यांनी सर्वांचे स्वागत करत आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =