You are currently viewing शिवजयंतीला कणकवलीत सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे भूमिपूजन
Oplus_16908288

शिवजयंतीला कणकवलीत सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा

८ कोटींची तरतूद; खासदार नारायण राणे यांच्या शिकवणीतून प्रकल्पाला गती

कणकवली :

कणकवली शहरात शिवजयंतीच्या औचित्याने सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली. १९ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या जागेवर हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

या प्रकल्पासाठी ८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता व तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. “कणकवलीकरांवर माझं प्रेम राजकारणाच्या पलीकडचं आहे. दिलेला शब्द पूर्ण करायचाच, हीच आमची भूमिका,” असे ते म्हणाले.

खासदार नारायण राणे यांच्या ‘दिलेला शब्द पूर्ण करायचा’ या शिकवणीतूनच या प्रकल्पाला गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. कणकवलीत भव्य नाट्यगृह व मराठा समाजासाठी हक्काचे सांस्कृतिक भवन व्हावे, ही अनेक वर्षांची मागणी होती. नगरपंचायत निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द आता पूर्णत्वास नेला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या असून, दर्जेदार व सुयोग्य नियोजनानुसार बांधकाम करण्यात येणार आहे. मराठा समाजाला विश्वासात घेऊन आणि कणकवलीकरांच्या आशीर्वादाने शिवजयंतीदिनी भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा