You are currently viewing शुभंकरोति साहित्य परिवार, चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आणि चौथा वर्धापन दिन ८ फेब्रुवारी २०२६ नाशिक येथे संपन्न

शुभंकरोति साहित्य परिवार, चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आणि चौथा वर्धापन दिन ८ फेब्रुवारी २०२६ नाशिक येथे संपन्न

साहित्ययज्ञाची चार वर्षांची वाटचाल

 

नाशिक :

“साहित्ययज्ञ हेच आमचे ध्येय”* म्हणत वाटचाल करणारा तर आहेच शुभंकरोति साहित्य परिवार हा खरोखरच एक अनोखा साहित्यिक परिवार आहे. सुमारे तीनशे सदस्यांचा हा परिवार असून त्यामध्ये अनेक लिहिते हात सक्रिय आहेत. नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत, अनुभवी लेखकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम साहित्यनिर्मिती घडवून आणण्याचे कार्य या परिवारातून सातत्याने केले जाते.

या साहित्यिक गोतावळ्याची निर्मिती मा. सोनाली जगताप यांनी केली आहे. त्यांच्यासोबत मा. प्रा. सुमतीताई पवार व मा. डॉ. मायाताई यावलकर यांचा त्रिवेणी संगम या परिवाराला बळ देणारा ठरतो. हा जणू साहित्यशक्तीचा जागरच आहे.

परिवाराच्या कार्यासाठी सहा सुज्ञ व कष्टाळू प्रशासकांचे प्रशासन सतत कार्यरत असते. यांच्यासोबत काही उत्साही हौशी लेखकही आपले मोलाचे योगदान देतात.

दर आठवड्याला प्रशासकांकडून लेखकांना चार लेखनविषय दिले जातात. त्यापैकी एक-दोन विषयांवर लेखक कविता, कथा व लेख लिहितात. तसेच आठवड्यातील दोन दिवस विविध साहित्यिक उपक्रम राबवले जातात. असे हे अखंड कार्य गेली चार वर्षे अविरत सुरू आहे.

या प्रवासातून अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यावर्षी झालेल्या विश्वविक्रम वाचन यज्ञ – “गोष्ट तुमची आमची” या उपक्रमातही शुभंकरोति साहित्य परिवाराचा मोठा सहभाग होता. तब्बल ६० ते ७० सदस्यांनी देश-विदेशातून वाचन करून या यज्ञात सहभाग नोंदवला.

चतुर्थ वर्धापन दिन – साहित्य संमेलन, नाशिक

शुभंकरोति साहित्य परिवाराचा वार्षिक व चौथा वर्धापन दिन, कुसुमाग्रजांना स्मरून “शब्दविहंग” या नामकर्णांमध्ये नामाधीश झाले. संमेलन दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी

प्रथम सत्रात ग्रंथदिंडीने रामनामाच्या आणि विठ्ठलाच्या गजरात आणि अभंगात ग्रंथांचे पूजन करताना शंख नादाने सुरुवात झाली. यात सर्व साहित्यिकांनी मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभाग घेतला.

शुभंकरोति म्हणजे साहित्ययज्ञ आहेच, परंतु वाचनदिंडीचे द्योतकही आहे. वाचनसंस्कृती वाढवणे, हे आमचे केवळ ध्येय नाही तर ध्यासदेखील आहे आणि म्हणूनच *आजीच्या पुस्तकाचे हॉटेल* ही पुस्तकांची मंदियाळी आम्हाला लाभली. नाशिक येथील “आजींच्या पुस्तकांचे हॉटेल” येथे अत्यंत दिमाखात हे संमेलन घेण्यात आले आणि उत्कृष्ट लेखकाच्या पुस्तकांचा आस्वादही घेण्यात आला.

या संमेलनाचे सूत्रसंचालन मा. जितू आर. म्हात्रे व मा. शिल्पा चऱ्हाटे यांनी केले. मागील पिढीतील थोर गायिका मा. उषा कीर्तने उर्फ राजश्री शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. नमिता कीर (अध्यक्षा – कोमसाप, मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.

पहिले सत्र

संमेलनाच्या पहिल्या सत्रात मा. नमिता कीर (कोकण साहित्य परिषद – केंद्रीय अध्यक्षा) या संमेलनाध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या.

उद्घाटक म्हणून मागील पिढीतील थोर व उत्कृष्ट गायिका मा. राजश्री शहा उर्फ पूर्वाश्रमीच्या उषा कीर्तने यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सत्रात उषाताई कीर्तने यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. सदर मुलाखतीच्या मुलाखतकार म्हणून मा. डॉ. सुषमा दाते लाभल्या होत्या. मुलाखतीचे सूत्रसंचालन मा. राधा गर्दे यांनी अतिशय प्रभावीपणे केले.

या सत्राला विशेष मान्यवर म्हणून मा. सुरेश पवार (संस्थापक – गिरणा गौरव प्रतिष्ठान) उपस्थित होते.

तसेच स्वागत अध्यक्षा म्हणून मा. रंजना बोरा यांचीही मानाची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात मा. ऋचा पारेख यांच्या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर मा. रेणुका मार्डीकर यांनी शुभंकरोति गीत सादर केले.

या प्रसंगी शुभंकरोति गुणगौरव पुरस्कार,

१) योगाचार्य मा. प्रज्ञाताई पाटील

२) सुप्रसिद्ध निवेदिका मा.क्षिप्राताई मानकर

३) मा. सुरेशदादा पवार, (गिरणा गौरव प्रतिष्ठान)

४) मा. वसंतदादा खैरनार (लेखक तुमच्या भेटीला)

५) मा. हरिभाऊ कुलकर्णी (रेडिओ विश्वास)

६) मा. आरतीताई गुप्ते,

(अभिनेत्री-साहित्यिक)

तसेच पाच संस्थांना ‘मराठी प्रकाशवाट पुरस्कार’ जाहीर करण्यात आले.

१. साहित्यसंपदा

2. शब्दशिल्प कला अविष्कार संघ

3. मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठान

4. शब्द कवडसा

5. सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ.

तसेच एक प्रकाश वाट पुरस्कार प्रत्यक्ष एका व्यक्तीस प्रदान करण्यात आला. नाट्यशास्त्र, दिग्दर्शन, लेखक नाशिक येथील मा. रोहित चौधरी यांना देण्यात आला.

*शुभंकरोतिपरिवारातील सदस्यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.*

१. (शुभंकरोति साहित्य गुणगौरव पुरस्कार) मा. अरुणाताई मुल्हेरकर

२. मा. किरण दादा वेताळ (तज्ज्ञपरीक्षक)

३. मा. राधिकाताई भांडारकर (सकाळ सदर)

४. मा. मायाताई यावलकर (सकाळ सदर )

५. मा. पांडुरंग कुलकर्णी (उत्कृष्ट अभिष्टचिंतन प्रमुख)

६. मा. दिपाली घाडगे (उत्कृष्ट साहित्य निर्मिती)

७. मा आशा पाटील. (लेखन सातत्य)

८. मा. रेणुका मार्डीकर (उत्कृष्ट साहित्य उपक्रम प्रमुख)

९. मा. ऋचा पारेख (उत्कृष्ट समूह उत्सव नियोजन सहभाग)

१०. मा. माधुरी वानखडे (उत्कृष्ट युवा लेखक पुरस्कार)

११. मा. हेमंत दादा कुलकर्णी (उत्कृष्ट अभिवाचन)

मा. प्रा. सुमतीताई पवार यांना “जीवनगौरव” हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आजींच्या पुस्तकांच्या हॉटेलमधील आजींना गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

पुस्तक प्रकाशन ही सुंदर झाले

१. मा. राधिकाताई भांडारकर -अंश

२. मा. ऋचाताई पारेख-औक्षणातल्या आठवणी

३. मा. राधाताई गर्दे – मनस्वी

४. मा. मायाताई यावलकर- गाथा अनुभवांची

५. सरोज बारोट-हाईकु त्रिवेणी, सरोजनी सबद विणावली 🙏

 

विविध साहित्यिक सत्रे

दुसऱ्या सत्रात अभिवाचन सत्र झाले, ज्याचे अध्यक्ष मा. कमलाकर राऊत होते. या सत्राचे सूत्रसंचालन मा. डॉ. मायाताई यावलकर यांनी केले.

निमंत्रित काव्यसंमेलन – अध्यक्षा: मा. डॉ. पल्लवी परुळकर बनसोडे,

सूत्रसंचालन: मा. मानसी म्हसकर (गुजरात)

निमंत्रित गझल मुशायरा – अध्यक्ष: मा. डॉ. मनोज वराडे,

सूत्रसंचालन: मा. किरण वेताळ (पुणे)

कविसंमेलन – अध्यक्ष: मा. रवींद्र यशवंतराव देशमुख, याचे सूत्रसंचालन मा सोनाली जगताप यांनी केले.

कवी संमेलनात काव्य स्पर्धेत पाच क्रमांक काढलेत

*रेणुका मारडीकर:- प्रथम क्रमांक

*राधा गर्दे: द्वितीय क्रमांक

*ऋचा पारेख: तृतीय क्रमांक

*डॉक्टर प्रतिभा हरणखेड उत्तेजनार्थ

*विद्याताई कुलकर्णी उत्तेजनार्थ

या सर्व मान्यवरांनी कवींना मोलाचे मार्गदर्शन केले.

 

स्मरणात राहणारा सोहळा

दरवर्षी शुभंकरोति साहित्य परिवाराची संमेलने वेगवेगळ्या शहरांत दिमाखात होतात. या वर्षी मा. उषाताई कीर्तने यांची मुलाखत विशेष गाजली.

त्यांच्या गोड गळ्याची झलक उपस्थितांची दाद मिळवून गेली. तरुणपणी त्यांनी गायलेले एक गाणे ऐकवताना उपस्थित भावूक झाले.

निसर्गरम्य परिसर, उत्तम जेवण, दुपारचा चहा-बिस्किटे यामुळे सर्व मंडळी तृप्त झाली. या सोहळ्यात अनेक पुस्तके मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाली व साहित्यिकांनी परस्परांना आपली पुस्तके भेट म्हणून दिली.

या कार्यक्रमा त भक्कम हात म्हणजे डॉक्टर संजय शहा, नीला बर्वे, सुमती पवार, डॉक्टर माया यावलकर, ऋचा पारेख, सुनील पारेख, गीतांजली वाणी अशा या दिमाखदार व प्रेरणादायी संमेलनाच्या आठवणी मनात साठवत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी समाधानाने आपापल्या घरी रवाना झाली.

 

— सुमती पवार, नाशिक

दि. १२/०२/२६

प्रतिक्रिया व्यक्त करा