You are currently viewing अभंग संपदेचं देहू गावी होणार प्रकाशन

अभंग संपदेचं देहू गावी होणार प्रकाशन

पुणे :

सामाजिक, संप्रदायिक आणि शिक्षण या विभागामध्ये आपले आयुष समर्पित केलेल्या अनेक नामवंत, गुणवंताच्या सामूहिक प्रयत्नातून अभंग संपदा प्रातिनिधिक ग्रंथाचे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या महाराष्ट्रातील देहूगावी प्रकाशन होणार आहे. हा प्रकाशन सोहळा दिनांक 17/02/2026 रोजी स.11ते 03.00 वा. अभंग मंगल कार्यालय, गाथा मंदिर रोड देहूगाव येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या सोहळ्यास महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर, प्राचार्य गोविंद बिराजदार, प्राचार्य वेंकट अणिगुंटे, जागतिक लेवलवरचे पाणी संशोधक अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते विलास कुलकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक गुणवंत साहित्यिक सांप्रदायिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन काव्यप्रेमी महाराष्ट्र आणि उत्तरदायित्व एनजिओ फाउंडेशन या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने केले जाणार असल्याची माहिती फाउंडेशनचे विश्वस्त प्रमुख श्रुतीताई डिंबळे, नागेश गायकवाड, हरिचंद्र ढाकणे यांनी केले आहे.

अभंग संपदेतील साहित्यिकांना ट्रॉफी देऊन प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते सन्मानित केले जाणार आहे. तर इतर सहभागी साहित्यिक कवी यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अभंग संपदेचे संपादक भूमिपुत्र वाघ, सुधाकर झिंगाडे, कमलाकर भोसले, विकास राठोड तसेच प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण पवार यांची उपस्थिती असणार आहे. विविध क्षेत्रातील साहित्यिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा