You are currently viewing कणकवलीत भाजप–शिवसेना महायुतीचा विजयाचा धडाका
Oplus_16908288

कणकवलीत भाजप–शिवसेना महायुतीचा विजयाचा धडाका

कळसुली जि.प.मध्ये शीतल दळवी, पंचायत समितीत लक्ष्मण गावडे व ओसरगावमध्ये अक्षता राणे विजयी

कणकवली :

कणकवली तालुक्यातील कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप–शिवसेना महायुतीच्या शीतल दळवी यांनी १०२५ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. शीतल दळवी यांना ४१११ मते मिळाली, तर उबाठा गटाच्या प्राची आमडोस्कर यांना ३०८६ मते मिळाली.

कळसुली पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण गावडे विजयी ठरले. गावडे यांना २५३३ मते मिळाली. उबाठा सेनेचे मनोहर मालंडकर यांना १२७४ मते, तर अपक्ष भालचंद्र दळवी यांना ८३ मते मिळाली. या मतदारसंघात नोटाला ८३ मते पडली असून एकूण ३९७३ मतदान झाले.

दरम्यान, ओसरगाव पंचायत समिती मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या अक्षता राणे यांनी विजय मिळवला. अक्षता राणे यांना १६९२ मते मिळाली, तर उबाठा गटाच्या चंदना राणे यांना १६१० मते मिळाली. अवघ्या ८२ मतांच्या फरकाने अक्षता राणे विजयी ठरल्या.

या निकालांमुळे कणकवली तालुक्यात भाजप–शिवसेना महायुतीची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा