You are currently viewing हिंदुत्वाच्या धगधगत्या अस्मितेतून ‘धर्मवीर बलिदान मास’ चा उद्या दोडामार्गात शंखनाद

हिंदुत्वाच्या धगधगत्या अस्मितेतून ‘धर्मवीर बलिदान मास’ चा उद्या दोडामार्गात शंखनाद

हिंदुत्वाच्या धगधगत्या अस्मितेतून ‘धर्मवीर बलिदान मास’ चा उद्या दोडामार्गात शंखनाद

दोडामार्ग

हिंदुत्वाच्या विचारांची ज्वाला अधिक प्रखर करत धर्मवीरांच्या बलिदानाची प्रेरणा जनमानसात रुजवण्यासाठी दोडामार्ग येथे ‘धर्मवीर बलिदान मास’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या प्रेरणादायी कार्यक्रमाला गुरुवर्य श्री संभाजीराजे भिडे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभणार असून, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता, श्री हनुमान मंदिर, दोडामार्ग येथे ही बैठक पार पडणार आहे. धर्म, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांना बळ देणारा हा कार्यक्रम तरुणांसह सर्व हिंदुत्वप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.
धर्मवीरांच्या बलिदानाची आठवण जागवून, त्यांच्या विचारांवर चालण्याची प्रेरणा देणारी ही बैठक दोडामार्ग तालुक्यात वैचारिक जागृतीचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा