You are currently viewing कोलगाव येथे दारूच्या नशेत बेफाम कार

कोलगाव येथे दारूच्या नशेत बेफाम कार

कोलगाव येथे दारूच्या नशेत बेफाम कार;  दुचाकीवरील महिला गंभीर जखमी

सावंतवाडी

तालुक्यातील कोलगाव येथे आज दुपारी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलगाव परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली असून, घटनेनंतर नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्याचवेळी तेथून प्रवास करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ वकील ॲड. बापू गव्हाणकर यांनी पुढाकार घेत आपल्या कारमधून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दारूच्या नशेत वाहन चालवित असताना चालकाकडून हा अपघात घडल्याचे सांगितले जाते. संतप्त नागरिकांनी संबंधित कार जप्त करून पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातामुळे काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा