You are currently viewing “विकास हाच माझा अजेंडा, विजय हाच निकाल!” – संदीप गावडे
Oplus_16908288

“विकास हाच माझा अजेंडा, विजय हाच निकाल!” – संदीप गावडे

तळवडे मतदारसंघासाठी ठोस व्हिजन; विरोधकांच्या गोंधळावर गावडेंचा थेट हल्लाबोल

सावंतवाडी / तळवडे :

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाला विकासात अव्वल स्थानावर नेण्याचा निर्धार मी केला असून, आजवर सुरू केलेली एकही विकासकामे अर्धवट ठेवणार नाही, असा स्पष्ट आणि ठाम संदेश महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी दिला.

विकास, प्रगती आणि तळवडे मतदारसंघाची सर्वांगीण उभारणी हेच माझे एकमेव व्हिजन असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. याच स्पष्ट भूमिकेमुळे जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून मला भरभरून पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे, विरोधक एकाच मुद्द्यावर अडकून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र त्यामुळे माझाच विजय अधिक सोपा होत आहे, असा टोला गावडेंनी लगावला.

महायुतीतील सर्व वरिष्ठ नेत्यांचे भक्कम आशीर्वाद माझ्या पाठीशी असून, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात विजय आपलाच आहे, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सभेत बोलताना सूरज परब यांनी महायुतीच्या ताकदीकडे लक्ष वेधत सांगितले, “महायुती आज भक्कम आणि अभेद्य आहे. कितीही राजकीय डावपेच रचले तरी येथे महायुतीचेच उमेदवार निवडून येणार आहेत. ९ फेब्रुवारीला विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार!”

प्रतिक्रिया व्यक्त करा