संस्कार नॅशनल स्कुलमध्ये आज संस्कार उत्सव..
सावंतवाडी
दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणेचे संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे स्नेहनसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वा. शाळा प्रांगणात उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास मध्यप्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री धर्माचार्य आणि विश्व ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष योगेंद्र महंतजी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रांत अधिकारी समीर घारे, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, तहसिलदार श्रीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक समिती आणि मुख्याध्यापक प्रणाली रेडकर यांनी केले आहे.
