You are currently viewing वेताळ–बांबर्डे जि.प. मतदारसंघात महायुतीची उमेदवारी जाहीर; नागेश नारायण आईर मैदानात

वेताळ–बांबर्डे जि.प. मतदारसंघात महायुतीची उमेदवारी जाहीर; नागेश नारायण आईर मैदानात

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत घोषणा; कार्यकर्ते व ग्रामस्थांमध्ये उत्साह

कुडाळ :

वेताळ–बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीतर्फे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नागेश नारायण आईर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही उमेदवारी जाहीर झाल्याने मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, काका कुडाळकर, दादा साईल यांच्यासह शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीतील घटक पक्षांच्या एकजुटीचे प्रभावी दर्शन यावेळी घडले.

नागेश नारायण आईर यांच्या उमेदवारीमुळे वेताळ–बांबर्डे मतदारसंघात आनंद आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा