You are currently viewing शहराच्या सुरक्षेतेसाठी सामाजिक बांधिलकीची आपत्कालीन व्यवस्थापन टीम सज्ज

शहराच्या सुरक्षेतेसाठी सामाजिक बांधिलकीची आपत्कालीन व्यवस्थापन टीम सज्ज

सावंतवाडी :

 

शहराच्या सुरक्षेतेसाठी सामाजिक बांधिलकीची नैसर्गिक आपत्कालीन व्यवस्थापन टीम सज्ज झाली आहे. सामाजिक बांधिलकी जेथे गरज आहे तेथे योग्य अशीच मदत करते असं प्रतिपादन प्रांताधिकारी प्रशांत पनवेकर यांनी केल.

दरवर्षाप्रमाणे या वर्षीही सावंतवाडीच्या सुरक्षितसाठी सामाजिक बांधिलकी नैसर्गिक आपत्कालीन व्यवस्थापन टीम सज्ज झाली आहे. या टिमच्या माध्यमातून शहरामध्ये नैसर्गिक आपत्तीद्वारे उगवणाऱ्या परिस्थितीवर मात करून तेथील परिस्थिती सुरळीत करण्याचे विनामूल्य सेवाभावी कार्य या टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे कौतुक प्रांताधिकारी पनवेकर यांनी केले आहे. यासाठी लागणारे मदत शासनामार्फत सामाजिक बांधिलकीला केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. नैसर्गिक अतिवृष्टीमुळे 24 तासात शहरांमध्ये कुठेही घटना घडल्यास ही टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन विनामूल्य मदत कार्य करणार आहे, अशी माहिती सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी दिली आहे. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, समीरा खलील, हेलन निबरे, शामराव हळदणकर, शेखर सुभेदार, रवी जाधव उपस्थित होते.

संपर्कासाठी खालील नंबर डायल करा असं आवाहन ही त्यांनी केले आहे.

रवि जाधव – 9405264027

संजय पेडणेकर – 7020812719

शेखर सुभेदार – 9423753042

समीरा खलील – 9890714614

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − eight =