You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी महासंघ कटिबद्ध…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी महासंघ कटिबद्ध…..

प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे

ऑल इंडिया धनगर समाज महासंघच्या वतीने तरंदळे धनगरवाडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

कासार्डे

तरंदळे धनगरवाडा ता.कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व अहिल्यादेवी शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट च्या वतीने 30 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप करण्यात आले. यावेळी बोलत असताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी महासंघातर्फे प्रयत्न करणार, त्यासाठी महासंघाची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सहित सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सज्ज आहे.
हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रविण काकडे साहेब, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. शंकरराव पुजारी ,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री. नवलराज काळे, महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा मार्गदर्शक श्री विजयसिंह काळे, सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख अथर्व जंगले, समाज बांधव विजय जंगले, गणेशराजे जंगले, धोंडी जंगले, सोनू खरात, विद्यार्थी आघाडी कणकवली तालुका सदस्य दिलीप खरात, लक्ष्मी खरात,नानी जंगले, श्री संजय कर्णीकर तसेच विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते.

तरंदळे : ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे व इतर पदाधिकारी

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 13 =