You are currently viewing सावंतवाडी शहर भाजप मंडलच्या शहराध्यक्षपदी युवा उद्योजक अजय गोंदावळे यांची निवड…

सावंतवाडी शहर भाजप मंडलच्या शहराध्यक्षपदी युवा उद्योजक अजय गोंदावळे यांची निवड…

युवा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य येणार…

सावंतवाडी शहरातील युवा उद्योजक, बिल्डर्स, हॉटेल्स व्यावसायिक अजय गोंदावळे यांची सावंतवाडी भाजपाच्या शहर मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्याकडून देण्यात आले. त्यांच्या निवडीचे समाजातील सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे. सावंतवाडी शहरातील अनेक युवक भाजपाचा पगडा असलेले आहेत, युवा उद्योजक अजय गोंदावळे यांच्या निवडीमुळे युवकांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण आहे.

अजय गोंदावळे यांचे सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध होते. शिवसेनेचे पर्यावरणमंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्या ते मंत्री नसताना सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्यावेळी आपल्या आलिशान गाडीतून गोवा एअरपोर्ट वरून सिंधुदुर्ग सफर अजय गोंदावळे यांनीच घडविली होती. सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राजकारणाशी काहीही संबंध नसलेले अजय गोंदावळे यांचा राजकीय उदय हा संजू परब यांच्या मैत्रीमुळेच झाला आहे. त्यामुळेच अल्पावधीतच त्यांच्याकडे सावंतवाडीच्या शहराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
युवा उद्योजक असलेले अजय गोंदावळे यांच्याकडून भाजपला पक्ष वाढीसाठी सावंतवाडी शहरात अपेक्षित असे कार्यकर्ते घडविण्याची अपेक्षा आहे. संजू परब यांनी अवैद्य धंद्यांच्या विरोधात उघडलेली मोहीम पुढे घेऊन जाण्याचीही शहराध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी असणार आहे. शहराध्यक्ष म्हणून नक्कीच ते पक्षासाठी भरीव कार्य करतील अशी आशा करून त्यांना नव्या राजकीय इनिंगसाठी शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 1 =