You are currently viewing लेप्टंन विनायक देसाई यांचा डेगवे आंबेखणवाडीच्या ग्रामस्थातर्फे सत्कार संपन्न.

लेप्टंन विनायक देसाई यांचा डेगवे आंबेखणवाडीच्या ग्रामस्थातर्फे सत्कार संपन्न.

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावचे सुपुत्र श्री विनायक चंद्रकांत देसाई हे भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून कार्यरत असताना सैनिक दलाच्या लेप्टंन पदाची विभागीय परिक्षा देत होते.त्यात ते उत्तीर्ण झाले असून “लेप्टंनपदी” त्यांची नुकतीच हैद्राबाद येथे नियुक्ती झाली आहे.त्यामुळे ते सदर ठिकाणी हजर होण्यापूर्वी आपल्या स्वग्रामी आले होते.त्याचे औचित्य साधून डेगवे -आंबेखणवाडीच्या ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार सोमवार दि.२७/३/२०२३ रोजी “श्री ब्राह्मणीतीर्थ क्षेत्र”आंबेखणवाडी येथे रात्री ८:०० वाजता आयोजित केला होता.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेगवे माजी सरपंच श्री मंगलदास देसाई हे होते.

यावेळी श्री ब्राह्मणी स्थळाचा पुजारी श्री वामन देसाई यांनी विधीवत पुजा करून देवतांना गाव गाराणे घातले.प्रास्ताविक भाषणात माजी सरपंच श्री मंगलदास देसाई यांनी डेगवे गांव हा सैनिक पेशा असणाऱ्या पैकी एक आहे.या गावातील अनेक सुपुत्राने पोलीस व सैनिक पेशा पत्करुन देशसेवा केली आहे.याचा आमच्या डेगवे ग्रामस्थांना सार्थ अभिमान वाटतो आहे.श्री विनायक देसाई यांच्या सारखी जिद्द व चिकाटी पाहून आमचे इतर बांधव त्यांची प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रात काम करतील असा आम्हाला दृढ विश्वास वाटतो.आजच्या युवाशक्तीला त्यांनी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

विनय देसाई याचा सत्कार जेष्ठ ग्रामस्थ श्री. मनोहर देसाई यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन केला.या वेळी त्याची आई व कुटुंबातील सर्व लोक व ग्रामस्थ आर्वजून उपस्थित होते.

सदर सत्काराला उत्तर देताना श्री.विनायक देसाई म्हणाले माझे अनेक सत्कार झाले परंतु आज माझा सत्कार घरातील लोकांनी केला आहे तो माझ्या साठी अविस्मरणीय क्षण आहे.तो मी कदापीही विसरू शकत नाही.माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली ती मला माझ्या आयुष्यात उर्जा देणारी आहे.मी ज्या भुमीत जन्माला आलो ज्या मातीत वाढलो.त्या मातीतील लोकांनी केलेले कौतुक निश्चितच मला प्रेरणादायी आहेत.त्याबध्दल मी सर्वांचा आभारी आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शामसुंदर देसाई,गोपाळ देसाई,सदानंद देसाई,वामन देसाई,विष्णू देसाई,तुकाराम देसाई,अत्माराम देसाई,विजय देसाई,योगेश मांजरेकर इत्यादी उपस्थित होते.

उल्हास देसाई,सरचिटणीस डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा