You are currently viewing मनाचे महत्त्व..

मनाचे महत्त्व..

बहिर्मनाचे कार्य कुठल्या प्रकारचे असते?

 

*बहिर्मनाचे स्थान आपल्या जीवनात फारच महत्वाचे आहे. ज्ञानेंद्रियांच्या द्वारे हे बहिर्मन जगाशी संबंध जोडून ज्ञान संपादन करते व ते ज्ञान अंतर्मनाच्या गोडाऊनमध्ये साठविले जाते. त्याचप्रमाणे विचार करणे, योजना आखणे, कल्पना करणे, चिंतन करणे वगैरे कार्य हे बहिर्मन करीत असते. त्याचप्रमाणे कर्मेद्रियांच्या द्वारा कार्यवाही करण्याचे कार्य सुद्धा हे बहिर्मन करते. या बहिर्मनाचे सर्वात महत्त्वाचे कार्य कळत नकळत अंतर्मनाची जडण घडण करणे हे होय. बहिर्मनात जे विचार घोळतात ते कालांतराने अंतर्मनात झिरपतात व मूळ धरतात. “Mind moves from thought to thing” असा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. मन विचाराकडून सरकत सरकत पुढे आकार रूपाने साकार होते. जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून “Thought world is more real than the Material world” प्रथम विचार आणि मग आकार असा प्रत्यक्षात आहे प्रकार. सामान्य लोकांना ह्या गोष्टीची जाणीव नसल्यामुळे ते विचार करतांना विचार करीत नाहीत. एखाद्या धर्मशाळेत जशी माणसे येतात आणि जातात व कोणाचाच कोणाला पत्ता नसतो, त्याप्रमाणे मनाच्या धर्मशाळेत अनेक विचार येतात, रहातात आणि जातात.*

*विचारात पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज,वायु आणि आकाश अतिशय सूक्ष्म रूपात वास करीत असतात. म्हणून विचार हीच एक प्रचंड शक्ती आहे. आपण आपल्या मनात जे विचार घोळवतो, ते अंतर्मनात जाऊन राहतात, तेथे मूळ धरतात व कालांतराने ते आपल्या जीवनात अनुभव, घटना किंवा परिस्थिती या स्वरूपात प्रगट होतात म्हणूनच ‘Mind well, the Builder of Destiny is Mind’ असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. याचा अर्थ असा की, आपल्या जीवनाचे शिल्पकार आपले मनच आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.*

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 12 =