You are currently viewing सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रिडा महोत्सव संपन्न

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रिडा महोत्सव संपन्न

*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रिडा महोत्सव संपन्न*

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल,वेंगुर्ला या शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. हा महोत्सव वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता.शाळेने या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असल्यामुळे क्रीडा महोत्सवाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना शाळा मार्फत टी-शर्ट प्रदान करण्यात आले याचे अनावरण शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे क्रीडा शिक्षक दिनेश जाधव यांनी श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धांना सुरुवात केली.
क्रिडादिनाचे महत्त्व सांगणारी मशाल प्रज्वलित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. शाळेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इयत्ता पाचवी ते दहावीच्या रेड, यलो,ग्रीन व ब्ल्यू या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी तसेच इयत्ता पहिली ते चौथी व प्रि प्रायमरी च्या विद्यार्थ्यांनी ड्रिलचे आकर्षक सादरीकरण करण्यात केले.
शाळेचा क्रीडा सचिव धनराज शिंदे याने सर्व विद्यार्थ्यांना क्रीडादिनाची शपथ दिली.
यानंतर सर्व क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. यामध्ये प्रि- प्रायमरी ते इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्री प्रायमरी ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बॉल इन द बास्केट , धावणे, लिंबू चमचा, सुई दोरा, बुक बॅलन्सिंग अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गोळा फेक, थाळीफेक, धावणे, टेबल टेनिस, बॅडमिंटन अशा प्रकारच्या वैयक्तिक क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक स्पर्धांमध्ये मुलींसाठी लगोरी, खो खो, रस्सीखेच, डॉजबॉल, रीले, तर मुलांसाठी क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल, खो-खो, रीले अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक स्पर्धांमध्ये विद्यार्थी हे आपापल्या हाऊस प्रमाणे सहभागी झाले होते. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा यांच्या हस्ते गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझ अशी मेडल्स आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
सामूहिक स्पर्धांमध्ये विजेत्या संघाला ट्रॉफी, मेडल आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या संघांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,संचालक प्रशांत नेरुरकर आणि सेक्रेटरी आनंद परळेकर यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक गजानन पालयेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा