You are currently viewing मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला सुवर्ण पदक

मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला सुवर्ण पदक

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी कु.ज्ञानेश्वर काकासो हांडे हा मुंबई विद्यापीठ कोकण झोन ५७ किलो कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे.
सदर स्पर्धा मुंबई विद्यापीठ अंतर्गत खोपोली येथे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ग्रामीण विभागासाठी आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये इतर महाविद्यालयातील ५१ खेळाडूनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये ५७ किलो वजन गटामध्ये ११ खेळाडू सहभागी झाले होते. आनंदीबाई रावराणे कॉलेजकडून कु.ज्ञानेश्वर काकासो हांडे हा एकमेव खेळाडु सहभागी झाला होता.
या ५७ किलो वजनी गटामध्ये त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त करून महाविद्यालयाचे नांव उंचावले आहे. संबंधित खेळाडुला कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, उपप्राचार्य ए. एम. कांबळे, क्रिडा प्रशिक्षक श्री.अशोक पाटील, क्रिडा विभागप्रमुख प्रा.एस. बी. पाटील, अधिक्षक श्री. संजय रावराणे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाकडून त्याचे अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा