*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बीज होऊनी रुजले मी..*
वार कितीही केले तरीही कधीच नाही थिजले मी
भर उन्हातही मातीमध्ये बीज होऊनी रुजले मी..
वादळवारे हेलपाटले भुईसपाटही झाले मी
मानकरूनी वरती पुन्हा आभाळाला भिडले मी…
कोसळल्या त्या वीजा किती पण कानठळ्याही बसल्या
सपसपमारा पाऊसधारा कोसळतांना बघते मी..
धीर करूनी गोळा सारा मातीमध्ये खोल मुळे
ऊन नि वारा सोबतीस ते पाहून त्यांना हसले मी…
मुळीच नाही हारणार मी ढग कोसळो वा बिजली
देव्हाऱ्यातील तेलवात अन् अंधाराला हसले मी…
सृजनाची मी असे देवता वरदान असे हो देवाचे
देतो शक्ती तोच साहण्या संकटास त्या हसले मी…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
