You are currently viewing हाथरस प्रकरणी योगीं आदित्यनाथांचा पलटवार..

हाथरस प्रकरणी योगीं आदित्यनाथांचा पलटवार..

उत्तर प्रदेश :

 

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. हाथरस प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. विरोधकांकडून जोरदार टीका होत असतानाच काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, ‘ज्यांना विकास रुचत नाही ते जातीय दंगली भडकवू इच्छितात’ असं म्हणत जोरदार पलटवार केला आहे.

मुख्यमंत्र्यानी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबत वक्तव्य करतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी विरोधकांचे कां उपटत, ‘ज्यांना विकास आवडत नाही ती लोकं देशात व प्रदेशात जातीय दंगली भडकवू इच्छितात. या दंगलीच्या आडून त्यांना विकास थांबवत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याची संधी मिळेल. यासाठीच नवनवीन षडयंत्र रचली जात आहेत. मात्र आम्हाल ही सर्व षडयंत्र ओळखून विकासाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे.’ असा संदेश लिहला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 6 =