You are currently viewing राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!”*

 

वैद्यकीय व्यवसाय आहे अक्षय व्रत

सेवा करिता मानवाची अखंडित IIधृII

 

रुग्णसेवेत सदा राहाता कार्यरत

मनुष्य प्राण्याला देता जीवन दान

समाजकार्य घडते बहु मूल्यवानII1II

 

कधी न पाहता वेळ काळ राहे सेवेत

कुणी निंदा-वंदा कार्यात राहता मग्न

यशापयश पचविता शांत मनानंII2II

 

समाज आरोग्य आहे तुमचे हातांत

धन्वंतरीचे तुम्ही पाईक सुपूत

योग्य वेळी निर्णय घेता धाडसानंII3II

 

सर्व औषधे ठेवता स्मरणांत

तपासून करिता योग्य निदान

रुग्णां बरे वाटता देती घेती आनंदII4II

 

श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा