You are currently viewing आचरा देवूळवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

आचरा देवूळवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

मालवण

मंगळवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वा-यासह आलेल्या पावसामुळे देवूळवाडी येथील नवलनाथ पेंडूरकर यांच्या घरापाठीमागे असलेल्या आंबा कलमाची मोठी फांदी मोडुन पडल्याने पडवीचे नुकसान झाले .या फांदी मुळे दोन माडही मोडुन पडले. दैव बलवत्तर म्हणूनच यातुन पेंडूरकर कुटुंबीय सहीसलामत बचावले. पोटमाळ्यामुळे पडवीत बांधलेली म्हैस आणि रेडकुहि वाचले.याबाबत महसूल कडून घटनास्थळी भेट देवुन नुकसानीचा पंचनामा केला. यात सुमारे बेचाळीस हजार सातशे पन्नास रुपयांचे नुकसान झाले.

मंगळवारी रात्री गप्पा मारत बसलेल्या पेंडूरकर कुटुंबीयांना अकस्मात आवाज करत घरापाठीमागे असलेल्या भल्या मोठया आंबा कलमाची फांदी घरालाच लागून असलेल्या गुरेबांधण्याच्या पडवीवर पडली.फांदी चे वजन एवढे मोठे होते की लगतचे दोन माडही मोडुन पडले होते. सदर फांदी थोडी अलीकडे पडली असती तर घराचे मोठे नुकसान होत घरातील माणसानाही मोठी दुखापत झाली असती.पण दैव बलवत्तर म्हणूनच पेंडूरकर कुटुंबीय या संकटातून बचावली.पोटमाळ्यामुळे पडवीत बांधलेली म्हैस आणि रेडकुही बचावले.यात पडवीचे छप्पर मोडून आतले गवतही भिजून नुकसान झाले आहे. याबाबत आचरा मंडल अधिकारी अजय परब यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा तलाठी संतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी यांनी घटनास्थळी भेट देवुन नुकसानीचा पंचनामा केला. यात छप्पराची कौले,वासे तुटुन अंदाजे बेचाळीस हजार सातशे पन्नास रुपयांचे नुकसान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा