वैभववाडीतील मुख्य चार रस्ते तात्काळ निर्धोक करा समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांचे सा.बां. ला निवेदन…..

वैभववाडीतील मुख्य चार रस्ते तात्काळ निर्धोक करा समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांचे सा.बां. ला निवेदन…..

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील प्रमुख चार रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दुरवस्था झालेले सदर चार रस्ते तात्काळ निर्धोक करा. या मागणीचे निवेदन जि.प. समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले आहे.
वैभववाडीतील तरेळे – वैभववाडी रस्ता, फोंडा – वैभववाडी रस्ता, वैभववाडी – उंबर्डे रस्ता व खारेपाटण – गगनबावडा रस्ता हे चार रस्ते सद्यस्थितीत वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. वाहन चालविणे या मार्गावरून जिकरीचे झाले आहे. या रस्त्यात अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. दयनीय अवस्था असताना आपल्या विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्यात अपघात घडल्यास जबाबदार कोण ? संबंधित रस्ते तात्काळ दुरुस्ती होणे फार गरजेचे आहे. तरी तात्काळ दुरुस्ती करावी असे निवेदनात सभापती शारदा कांबळे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा