You are currently viewing ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

*चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांची घोषणा; यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी शरद पवार यांच्या हस्ते वितरण*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा केली. स्व. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.

चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डाॅ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. मनोहर यांनी मराठी साहित्यात सातत्याने कसदार लेखन केले आहे. समाजातील नाकारलेल्या माणसांच्या जगण्यातला उद्वेग, आशय – अभिव्यक्ती मांडणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या १९७७ साली प्रकाशित झालेल्या ‘उत्थान गुंफा’ या पहिल्याच कवितासंग्रहाची वाङ्मयजगतामध्ये विशेष दखल घेतली गेली. त्यांच्या साहित्यातून मानवतावादी दृष्टीकोन आणि संविधानातील मूल्यजागर स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी डाॅ. यशवंत मनोहर यांचे अभिनंदन केले आहे.

स्व. चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी कृषी, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापन, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण, आर्थिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार’ देण्यात येतो.

या पुरस्काराची सुरुवात १९९० पासून झाली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, ज्येष्ठ कवयित्री स्व. शांता शेळके, ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर, प्रा. एन.डी. पाटील, सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया आदी मान्यवर साहित्यिक आणि संस्थांना या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.

 

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + eight =