You are currently viewing भोसले पॉलिटेक्निकच्या 8 विद्यार्थ्यांची फिलिप्समध्ये निवड

भोसले पॉलिटेक्निकच्या 8 विद्यार्थ्यांची फिलिप्समध्ये निवड

भोसले पॉलिटेक्निकच्या 8 विद्यार्थ्यांची फिलिप्समध्ये निवड..

सावंतवाडी

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागातील आठ विद्यार्थ्यांची पुणे येथील फिलिप्स हेल्थकेअरमध्ये निवड झाली आहे. कंपनीने नुकत्याच आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये ही निवड करण्यात आली._

निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे – विवेक कविटकर, चंद्रकांत भालेकर, जयेश देसाई, नमिता गावडे, नागेश पवार, ऋषिकेश सावंत, दीक्षा हडकर, सयान शेख. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख बाळासाहेब पाटील, ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर श्रुती हेवाळेकर व ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख मिलिंद देसाई यांचे मार्गदर्शन लाभले._

संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य गजानन भोसले यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._

प्रतिक्रिया व्यक्त करा