You are currently viewing डिंगणे शाळा नं १ च्या मुलांना स्पोर्ट्स ड्रेस प्रदान

डिंगणे शाळा नं १ च्या मुलांना स्पोर्ट्स ड्रेस प्रदान

माजी सभापती निकिता सावंत, माजी सरपंच नाना सावंत यांचा उपक्रम

बांदा

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती निकिता नाना सावंत यांनी स्पोर्ट्स ड्रेस प्रदान केलेत. सदर स्पोर्ट्स ड्रेस सौ. सावंत व डिंगणेचे माजी सरपंच नाना सावंत यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फटु सावंत, शिक्षण प्रेमी यशवंत डिंगणेकर, पालक सौ. सावंत, शाळेचे शिक्षक विश्राम ठाकर, सुनील पाटील, श्री. कर्पे आदी उपस्थित होत. शाळेचे मुख्याध्यापक श्री. ठाकर यांनी सौ. निकिता सावंत यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा